आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिली भेट
कळंबोली : रामप्रहर वृत्त
कळंबोली येथील अजिंक्य तारा मित्र मंडळ व श्री मंगलेश्वरी माता मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाला गुरुवारी (दि. 14) आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, नगरसेवक विक्रांत पाटील यांनी भेट दिली.
या वेळी त्यांचे आयोजकांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, ट्रान्स्पोर्ट सेलचे कोकण प्रदेश अध्यक्ष, मंडळाचे अध्यक्ष सिद्धू शर्मा, कळंबोलीतील नगरसेवक, नगरसेविका, रमेश राव, मलिक, रमेश गोदीया, देवीलाल चौधरी, राजकुमार, शर्मा प्रिंटर, राजेश चौधरी, विजेंदर, अंकुश, रमेश डीएमआर, संजय डागर, रिंकू शर्मा, सुशील शर्मा, अशोक शर्मा, जोशी, दिनेश शर्मा, रामदास कोरडे, अजित, प्रदीप बेलवाल, हिमांशू पाठक, रणदीप कनवार, राकेश शर्मा, संतोष सारस्वत, रमेश सिंग, बादल राठोड, वासुदेव शर्मा पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. दरम्यान, या वेळी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिरही आयोजित करण्यात आले होते, अशी माहिती कळंबोली कार्यालयीन चिटणीस जगदीश खंडेलवाल यांनी दिली.