पनवेल : वार्ताहर
नावांकूर सोसायटीची समस्या मार्गी लावण्यात नगरसेवक विक्रांत पाटील यांना यश आले आहे.
प्रभाग 18 मधील उपजिल्हा रुग्णालय समोरील नावांकूर सोसायटी समोर बरेच दिवस पाणी साचलेल्या अवस्थेत होते.स्ट्रॉम वॉटर ड्रेन मध्ये कचरा साचल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता, पाणी साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी येत होती व डांसांचा प्रादुर्भाव वाढला होता. याबाबतची तक्रार नावांकूर सोसायटीमधील रहिवाशांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे केली. नावांकुर मध्ये ज्येष्ठ नागरिक अधिक असल्याने त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्रास होऊ नये म्हणून नगरसेवक विक्रांत पाटील यांनी लगेच औषध फवारणी करून घेतली. महापालिका अधिकार्यांशी संपर्क साधून त्वरित नावाकूर समोरील स्ट्रॉम वॉटर ड्रेन मधील साचलेल्या कचर्याची सफाई करून घेतली. महापालिका कर्मचार्यांनी पूर्ण सफाई करून सोसायटी समोरील साचलेल्या पाण्याचा निचरा करून दिला. आपल्या तक्रारीवर लगेच पाऊले उचलत नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्वरित साफसफाई करून दिल्याबद्दल नावाकूर सोसायटीच्या रहिवाशांनी आभार मानले.