पनवेल : रामप्रहर वृत्त
केळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणार्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यात भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा वेग वाढवला असून, केळवणे जिल्हा परिषद गट क्रमांक 8 मधून मंगेश रामचंद्र वाकडीकर, केळवणे पंचायत समिती गण क्रमांक 15 मधून शितल अनंत माळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचा प्रचार अधिक
झाला आहे. या वेळी बोलताना केळवणे पंचायत समिती उमेदवार शितल अनंत माळी यांनी सांगितले की, पंचक्रोशीतील गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, गटारे, स्मशानभूमी यांची प्रलंबित कामे मार्गी लावणार, महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध प्रकारचे लघु उद्योग सुरू करून त्यांना स्वावलंबी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या माध्यमातून मी नक्की करेन हा आत्मविश्वास मला आहे हे सर्व प्रत्यक्षात उतरविण्यासाठी एक संधी जागृत मतदारांनी मला द्यावी, असे आवाहन मी या निमित्ताने सर्व मतदारांना करीत आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, माजी नगराध्यक्ष जे.एम म्हात्रे साहेब, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, विरोधी पक्ष नेते प्रितमजी म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वरजी घरत यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात झाली असून, प्रत्येक मतदारसंघात प्रचार रॅल्या आणि घरोघरी भेटी घेत मतदारांशी थेट संवाद साधण्यात येत आहे. दिवसभरात केळवणे गावात येथील आदिवासी वाड्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन भेटी दिल्या. प्रत्येक घरात जाऊन मतदारांशी संवाद साधत, आतापर्यंत करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती देण्यात आली.
या वेळी ज्येष्ठ नागरिक, महिला व युवकांनी उमेदवारांना भरभरून आशीर्वाद दिले. कमळ या भाजपच्या निवडणूक चिन्हाच्या घोषणांनी संपूर्ण परिसरात केला.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, पंचायत समितीचे माजी उपसभापती जिवन म्हात्रे, केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष विद्याधर जोशी, भाजप नेते हिरामण ठाकूर, केळवणे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष सुशिल ठाकूर, सुरेश बारका पाटील, भानुदास गावंड, गाव अध्यक्ष रामचंद्र मोकल, केळवणे ग्रामपंचायत सदस्या उज्वला ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, सदस्या शितल पाटील, अनंत माळी, नंदू गावंड, रविंद्र माळी, तेजस माळी, राजेश घरत, शर्मिला माळी, योगेश घरत, दर्शन मोकल, भारत ठाकूर आदी उपस्थित होते.
Check Also
पनवेलमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप महायुतीचा ऐतिहासिक विजय
शेकापचा सुपडा साफ! पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper