Breaking News

भात कापणीसाठी मजुरांचा अभाव

उरणमधील शेतकरी चिंतातूर

उरण : रामप्रहर वृत्त

रायगडात भात कापणी सुरू झाली असून सर्वत्र शेतमजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकरी भातकापणीसाठी भातकापणी यंत्राचा वापर करतो, मात्र उरण तालुक्यात हे भात कापणी यंत्र पोहचले नसल्यामुळे येथील शेतकर्‍यांना भातपिक कापण्यासाठी मजुरांशिवाय पर्याय उरला नसल्याने मजुरांअभावी भातपिकांची कापणी वेळेवर होत नसल्यामुळे येथील शेतकरी चिंतातुर झाला आहे.

भात कापणीकरीता मजूर मिळत नसल्याने येथील शेतकरी हवालदिल आहेत. उरण तालुक्यात विभागात अनेक ठिकाणी आदिवासी मजुरांचा वापर होतो. उरण तालुका हा भाताचे कोठार समजले जाते, परंतु मागील काही वर्षापासून शेती व शेतकर्‍यांचे वेगवेगळ्या माध्यमातून नुकसान होत आहे. त्यातच भातशेती ही पूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेतकर्‍यांना कधी ओला दुष्काळ तर कधी सुक्या दुष्काळाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी जमिनी लागवाडी खाली न आणता त्या ओसाड ठेवल्या जातात. भात कापणीकरीता कृषी खात्याकडून 50 टक्के अनुदानातून भात कापणी यंत्र उपलब्ध करून देण्यात येते. शेतकरी असल्याचा दाखला, सातबारा उतारा व बँक खाते, पासबुक आदी कागदपत्रे शेतकर्‍यांनी कृषी खात्याकडे दिली तर त्यांना हे यंत्र 50 टक्के सवलतीच्या दराने मिळणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले, परंतु येथील शेतकर्‍यांना शेती परवडत नसल्याने भात पीक कापणी यंत्र घ्यायला कोणीच तयार होत नाही. त्यामुळे ज्या मुठभर शेतकर्‍यांनी भातशेती लागवडीखाली आणली आहे त्यांना वेळेवर मजूर मिळत नसल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.

Check Also

पेणमध्ये आज आमदार रविशेठ पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

पेण ः प्रतिनिधी विधानसभेची लगबग सर्वत्र सुरू आहे. पेण मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री आमदार रविशेठ …

Leave a Reply