मुंबई ः प्रतिनिधी
जपानमध्ये होणार्या 50व्या जागतिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेच्या सिनिअर गटासाठी व ढाका येथे होणार्या सेंट्रल साउथ आशिया जिम्नॅस्टिक्स स्पर्धेकरिता ज्युनिअर व सिनिअर गटासाठी भारतीय संघाची नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर निवड करण्यात आली. यात आशियाई स्पर्धेत मुंबईतील विलेपार्लेच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडासंकुलचा निशांत करंदीकर याची निवड झाली. निशांतने विशाल कटकदौड व नीलम बाबर-देसाईयांच्या मार्गदर्शनाखाली जिम्नॅस्टिक्सचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. आता तो पुढील स्पर्धात्मक प्रशिक्षणासाठी शुभमगीरी यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे. निशांतच्या निवडीमुळे संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू, कार्यवाह मोहन राणे, मुख्याधिकारी प्रीतम केसकर यांच्यासहित संपूर्ण संकुलात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.