सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयात पनवेल महापालिका व राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन युवा स्वास्थ्य कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेचे उद्घाटन महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 25) झाले.
उद्घाटनसमयी कोकण प्रादेशिक विभागाचे सहसंचालक डॉ. संजय जगताप, पनवेल महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, लसीकरण अधिकारी डॉ. मनीषा चांडक, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. के. पाटील, राष्ट्रीय उच्चतम शिक्षा अभियानाचे समन्वयक डॉ. शैलेश वाजेकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे आदी उपस्थित होते. या वेळी कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाने महाविद्यालयीन संकुल परिसरात नोंदणी कक्ष, प्रतीक्षालय, लसीकरण कक्ष, संगणक कक्ष, निरीक्षण कक्ष, लसीकरण प्रमाणपत्र वितरण कक्ष यांची व्यवस्था केली आहे. तेथे महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग लसीकरणासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
या मोहिमेबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पाटील तसेच डॉ. वाजेकर, प्रा. परकाळे, प्रा. साठे, प्रा. कांबळे, ग्रंथपाल रमाकांत नवघरे, डॉ. योजना मुनिव, प्रा. सागर खैरनार, प्रा. आकाश पाटील, प्रा. अपूर्वा ढगे तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी कौतुक केले.