Breaking News

आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

माणगाव ः प्रतिनिधी

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या आदिवासी बांधवांवर उमासमारीची वेळ येऊ नये यासाठी निजामपूर विभागातील बोंडशेत नमस्कार मित्र मंडळातर्फे बोंडशेत आदिवासीवाडी  येथील कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. नमस्कार मित्र मंडळाच्या माध्यमातून निजामपूर विभागात जनजागृती व मास्कवाटप करण्यात आले. आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नमस्कार मित्र मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. इंद्रजित गायकवाड, उपाध्यक्ष संतोष मानकर, सचिव दीपेश जाधव, खजिनदार शाम मानकर, माजी अध्यक्ष जगदिश मानकर, विनोद चव्हाण, राजू मानकर, विजय मानकर, प्रफुल्ल पवार, कृतिका मानकर, गणेश  मानकर, मंगेश कदम,  सुशिल जाधव,  प्रशांत चव्हाण, आदित्य मानकर, रूपेश मानकर, अमोल चव्हाण, भावेश जाधव, राजेश राणे, बादल मानकर, संयोग मानकर, प्रज्योत चव्हाण, श्रवण मानकर, इशांत मानकर, प्रमोद सुर्वे, अनिरुद्ध मानकर, संजोग मानकर, पत्रकार संतोष गायकवाड व पोलीस पाटील सुनील उभारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply