मुंबई ः प्रतिनिधी
ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने एसटी कर्मचार्यांवर अन्याय केला आहे. थकीत महागाई भत्ता, घरभाडे, वार्षिक वेतनवाढीच्या दराबद्दल ठोस कोणताही निर्णय न घेता फक्त पाच टक्के महागाई भत्ता दिल्याने राज्यभरातील एसटी कर्मचार्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सर्व संघटना मिळून तयार करण्यात आलेल्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून बुधवार (दि. 27)पासून एसटी कर्मचार्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटी महामंडळातील कर्मचार्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एकरकमी दिवाळीपूर्वी मिळणे अपेक्षित होते, मात्र राज्य सरकारने दिवाळी गोड करण्याऐवजी कडू केली आहे. या प्रलंबित मागण्यांवर सरकार गंभीर होत नसून सरकारी धोरणाविरोधात एसटीतील सर्व संघटना एकत्र आल्या आहेत. त्यानुसार राज्यभरातील डेपो, आगार पातळीवरील सर्व एसटी कर्मचारी बेमुदत आमरण उपोषणात सहभागी होणार असून या सर्व संघटनांचे पदाधिकारी मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात उपोषणाला बसणार आहेत.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …