पनवेल : रामप्रहर वृत्त
डॉ. विनोद गीते यांना कोरोना योद्धा व आरोग्यदूत पुरस्काराने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवतरुण मित्र मंडळ यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल डॉ. गीते यांचे अभिनंदन केले जात आहे. नवतरुण मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. त्या वेळी त्यांचे स्वागत करताना मंडळाचे कार्याध्यक्ष व भाजप युवा मोर्चा अध्यक्ष जितेंद्र काटकर, मंडळाचे अध्यक्ष प्रताप चव्हाण, खजिनदार राजेश पाटील, राजू सावंत, सुभाष गावडे, आनंद सोनवणे, अजित लुबाळ, पकंज सोलनकर, तानाजी लोखंडे, तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. वैश्विक कोरोना संकटात नावडे शहरात मानवतावादी दृष्टिकोन ठेवून कोरोना बाधित आणि अन्य रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यावर उपचार करणारे नावडे शहरातील डॉ. विनोद गीते यांना कोरोना योद्धा व आरोग्यदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.