Breaking News

ड्रेनेजच्या सभोवताली पडलेला खड्डा बुजविला

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुका पोलीस स्टेशन समोर असलेल्या चौकात ड्रेनेज झाकणाच्या बाजूला पडलेला खड्डा नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या तत्परतेने बुजविण्यात आला.

स्वामी नित्यानंद मार्ग या मुख्य रस्त्यावरील तालुका पोलीस स्टेशन समोर असलेल्या चौकात ड्रेनेज झाकणाच्या बाजूला असलेले पेव्हर ब्लॉक दबले गेल्यामूळे खड्डा पडला होता. त्यामुळे रहदारीस अडचण निर्माण होत होती तसेच रिक्षा व दुचाकी वाहन चालकांना ही या खड्डयामुळे त्रास होत होता. या बाबतची तक्रार अनेक नागरिक, वाहन चालक आणि रिक्षा चालकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे केली.

विक्रांत पाटील यांनी महानगरपालिका अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगून त्वरित हा त्रासदायक खड्डा बुजवून घेतला. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Check Also

नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिटला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट व शुभेच्छा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्तनवीन मुंबईतील यू बिझनेस मीटच्या वतीने नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट …

Leave a Reply