पनवेल : वार्ताहर
सर्वसामान्य गोरगरीबांचे नागरी प्रश्न सोडविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक मुकीद काझी तत्पर असून त्यांनी त्यासाठी ते त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर भररस्त्यात उभे राहून नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवित आहेत. त्यामुळे मोहल्ला परिसरासह पनवेलमधील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
मोहल्ला परिसरात मुकीद काझी यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्य रस्त्यावरच एका दुकानात कार्यालय सुरू केले. या ठिकाणी त्यांनी एक पंखा सुद्धा लावून घेतला आहे व 10 खुर्च्या तेथे आणून अनेक नागरिकांच्या समस्या रस्त्याच्या बाजूला बसून ते सोडवितात. त्यामुळे अनेक जण त्या ठिकाणी येऊन आपल्या व्यक्तीगत समस्या, पोलीस ठाणे, नगरपालिका व इतर समस्या त्यांच्या समोर मांडतात. काझीसुद्धा तातडीने संबंधित विभागाशी संपर्क साधून त्या समस्यांचे निराकरण करतात.
आमचे मार्गदर्शक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असतो. त्यांचे प्रोत्साहन वेळोवेळी मिळत असल्याने काम करायला एक वेगळीच उर्जा मिळते. कुठे बसून काम करतो हे महत्त्वाचे नसून लोकांच्या समस्या त्वरित सोडविल्या जातात हे महत्वाचे आहे, असे नगरसेवक मुकीद काझी यांनी सांगितले.