मुंबई ः प्रतिनिधी
बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनला 25 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. आर्यनच्या जामिनासाठी शाहरूखची मैत्रीण व अभिनेत्री जुही चावला ही जामीनदार म्हणून राहिली आहे. एक लाखांच्या जातमुचलक्यावर आर्यची जामिनावर सुटका झाली.
आर्यनच्या जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने 14 अटी घातल्या आहेत. आर्यन हा पोलिसांना कळवल्याशिवाय मुंबई सोडू शकणार नाही. त्याला दर शुक्रवारी एनसीबीसमोर हजर राहावे लागेल, असे या अटींमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याला त्याचा पासपोर्ट जमा करावा लागणार आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …