Breaking News

पोलीस अधिकारी असल्याचे सांगून महिलेचा विनयभंग

पनवेल : वार्ताहर

स्पा व्यवसाय चालविणार्‍या महिलेकडे पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून तिच्याकडे खंडणीची मागणी करून न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग करणारा तोतया पोलीस अधिकारी इसमास खारघर पोलिसांकडून अटक करण्यात आली.

यातील आरोपी याने पोलीस अधिकारी असल्याचे सांगून तशी वेशभूषा करून तक्रारदार महिलेचे ब्युटी पार्लर व स्पाचे दुकान चालू ठेवण्याकरिता दरमहा 2000 रुपये प्रमाणे रोख व गुगल पेद्वारे रक्कम स्वीकारून लॉकडाऊन काळात पैसे दिले नाहीत म्हणून महिलेस शिवीगाळी करून, जिवे मारून टाकण्याची धमकी देऊन तिच्याबरोबर अगोदर झालेल्या भेटीदरम्यान त्याने नकळत त्याच्या कारमध्ये सदर महिलेशी केलेले विनयभंगाचे कृत्य आरोपीने मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल करण्याची धमकी दिली. या मोबदल्यात एक लाख रुपयाची मागणी करून ते न दिल्याने सदरचा व्हिडीओ व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल केल्याने याबाबतची तक्रार सदर महिलेने खारघर पोलीस ठाण्यात देताच पोलीस आयुक्त विपिन कुमार सिंह, सह. पोलीस आयुक्त जय जाधव, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहा पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर पोलीस ठाणेकडील वपोनि संदीपान शिंदे, मपोनि विमल बिडवे (गुन्हे), सपोनि मानसिंग पाटील, पोहवा वैद्य, पोना धनवटे, चौधरी, पाटील व पथकाने सदर आरोपीला तांत्रिक तपासाच्या आधारे पकडले. अटक आरोपी गुर्शिदप्पा अंबादास वाघमारे (वय 47 वर्षे) विरोधात मुंबईतसुद्धा अशा प्रकारचे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे असल्याची माहिती मिळाली आहे. या आरोपीच्या अटकेमुळे एकंदरीत आठ गुन्हे व अदखलपात्र 14 गुन्हे उघडकीस आले आहेत.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply