Breaking News

कोरोनाबाबत हलगर्जीपणा केल्यास पुन्हा संकट; लसीकरण आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

100 कोटी डोस झाले असले तरी जर आपण हलगर्जीपणा केला, तर एक नवीन संकट येऊ शकते, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाच्या आढावा बैठकीत दिला. विदेश दौर्‍यावरून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 3) लसीकरणाचा आढावा घेतला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी 40 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, लसीकरणात आतापर्यंत झालेली प्रगती ही तुमच्या मेहनतीमुळे आहे. प्रशासनातील प्रत्येक सदस्य, आशा कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी मैल पायी चालत दुर्गम ठिकाणी लसीकरण केले. पण 100 कोटी डोस झाले असले तरी जर आपण हलगर्जीपणा केला, तर एक नवीन संकट येऊ शकते. लसीकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे अनेक विकसित देशात कोरोनाचे संकट पुन्हा आले आहे. आपण हे मुळीच स्विकारु शकत नाही. हे आपण सहन करू शकणार नाही. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस वेळेवर घेणे खूप महत्त्वाचे आहे.आपण ‘सबको वैक्सीन, मुफ्त वैक्सीन’ मोहिमेअंतर्गत एका दिवसात सुमारे 2.5 कोटी लसीचे डोस दिले आहेत. यातून आपली क्षमता काय आहे, आपले सामर्थ्य काय आहे हे दिसून येते. असे नरेंद्र मोदी म्हणाले.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply