वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा; मनसे नेते संदीप देशपांडेंचा शिवसेनेला टोला

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईत मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना या दोन्ही पक्षांकडून अधिकाधिक आक्रमकपणे आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर दिवाळी संपताच रविवारी सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा, असा मेसेज पोस्ट केला आहे. त्यामुळे नेमके या ट्वीटमागचे गणित काय आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. संदीप देशपांडेंनी आपल्या ट्वीटमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संदीप देशपांडे मुंबईतील मोठ्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा इशारा देताना दिसत आहेत. भ्रष्टाचार करणारे अनेक नगरसेवक तुम्ही पाहिले असतील, पण भ्रष्टाचाराचे पैसे चेकने घेणारे नगरसेवक तुम्ही पाहिले नसतील. लवकरच मनसे त्यांचा पुराव्यासकट पर्दाफाश करणार आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले आहेत. त्यामुळे आता मनसेकडून कोणत्या नगरसेवकावर निशाणा साधला जाणार आणि कुणाचा, तसेच कोणता भ्रष्टाचार बाहेर काढला जाणार, याची चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Check Also

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami W dzisiejszym artykule skupimy się na tym, …

Leave a Reply