पनवेल ः वार्ताहर
रिजन चेअरपर्सन ज्योती नागेश देशमाने यांच्या पुढाकाराने लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231- ए2 च्या रिजन 2 तर्फे जागतिक मधुमेह सप्ताहाचा शुभारंभ पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या सहकार्याने तालुका पोलीस स्टेशन पनवेल येथे आयोजित केलेल्या या मधुमेह तपासणी शिबिराचा सर्व पोलीस अधिकारी, तसेच कर्मचारी वर्गाने लाभ घेतला. मधुमेह सप्ताहाच्या शुभारंभाचे प्रमुख अतिथी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एल. जे. तावरी, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी डिस्ट्रिक्ट डायबिटीस कमिटी चेअरमन अनघा गांधी, राजेंद्र शहा, अचला शहा, रिजन 2 मधील सर्व क्लब ऑफिसर आवर्जून उपस्थित होते. शिबिराचे प्रमुख आकर्षण ज्योती थिएटरच्या कलाकारांनी मधुमेह होऊ नये यासाठी अवेअरनेसच्या दृष्टिकोनातून सुंदर पथनाट्य सादर केले, तसेच रिजन चेअरपर्सन ज्योती देशमाने यांनी दौंडकर यांना आश्वासन दिले की भविष्यात कोणत्याही शारीरिक व्याधींसाठी लायन्स क्लब आपल्या सेवेसाठी सदैव तप्तर असेल. तसेच दर सहा महिन्यांनी आम्ही लायन्सतर्फे आपली शारीरिक तपासणी करू, असे आश्वासन देण्यात आले.