Breaking News

माणगाव शहरात चोरी; पाच लाखांचे दागिने घेऊन चोरटे पसार

माणगाव : प्रतिनिधी

शहरातील इशरत प्लाझा बिल्डींगमधील एका घरातील पाच लाख 20 हजार 50 रुपये किमतीचे सोन्या, चांदीचे दागिने चोरून  अज्ञात चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना मंगळवारी (दि. 9) दुपारी घडली.

विजय दत्तू सत्वे (वय 49, रा. इशरत प्लाझा, बी विंग, रूम नं. 411, कचेरी रोड, माणगाव) यांच्या  उघड्या दरवाजातून मंगळवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास दोघा अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. आणि सुमारे पाच लाख 20 हजार 50 रुपये किंमतीचे सोन्या, चांदीचे दागिने घेवून पोबारा केला.

 या प्रकरणी विजय सत्वे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निरीक्षक अश्वनाथ खेडकर करीत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply