नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारताची महिला सेलिंगपटू नेत्रा कुमानन हिने स्पेनमधील सेलिंग चॅम्पियनशिप जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. नेत्राने ग्रॅन कनारिया सेलिंग चॅम्पियनशिपमधील रेसर रेडीयल प्रकारात सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणारी नेत्रा कुमानन ही भारताची पहिलीच महिला सेलिंगपटू ठरली आहे. स्पेनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत तीन देशांतील 20 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. नेत्रा कुमानन हिने तीन शर्यतींमध्ये बाजी मारली तसेच अखेरच्या दोन शर्यतींमध्ये तिने अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकावला. दरम्यान, याआधी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये नेत्रा कुमानन हिला आपला ठसा उमटवता आला नव्हता. 44 खेळाडूंमधून तिला 35व्या स्थानावरच समाधान मानावे लागले होते.