Breaking News

टीकाकारांना शास्त्रींचे सडेतोड उत्तर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलेय. टी-20 विश्वचषकात सुपर 12मधूनच भारत बाहेर पडल्यानंतर भारतीय संघावर जोरदार टीका झाली. यानंतर रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा करारही संपुष्टात आला. या सर्व घडामोडींवरच शास्त्री यांनी भाष्य केले तसेच भारतीय संघाने मागील सात वर्षांत अनेक सामने जिंकले, मात्र एकदा पराभूत झालो तरी लगेच पेन-पिस्तुल बाहेर येतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. शास्त्री म्हणाले, माझ्याबाबत माझ्या आयुष्यातील मागील सात वर्षांवरून मते बनवली जात आहेत. या काळात मी सार्वजनिक आयुष्यात असताना माझी चिकित्सा केली गेली. आता मी न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊन माझी चिकित्सा करणार्‍यांवर बोलण्याची वेळ आलीय. भारतात क्रिकेटचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे पराभवामुळे टीका होणे स्वाभाविक आहे, मात्र कधीकधी भारतीय संघावरील टीका खूप कठोर असते. असे असले तरी ही सर्व टीका मागे टाकून पुढे जाण्याला पर्याय नसतो. भारतात क्रिकेट हा धर्म आहे. तुम्ही पाच सामने जिंकल्यानंतर हरता तेव्हा पेन आणि पिस्तुल बाहेर येतात. कधीकधी हे फार विषारी असते. अशा वेळी कोणतीही तक्रार न करता ही टीका सहन करावी लागते. आम्ही खूप वेळा जिंकलो. लोकांना आम्हाला पराभूत पाहण्याची सवय नाही. त्यामुळे पराभवानंतर लोकांकडून झाडलेल्या ‘गोळ्या’ झेलणे हे प्रशिक्षकाचे काम असते, असे शास्त्री यांनी सांगितले. ते रिपब्लिक वर्ल्डशी बोलत होते. तुम्हाला हे सर्व अडथळे पार करून यावे लागते. तुम्हाला यामुळे खचून चालत नाही. तुम्हाला संघ त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल यासाठी प्रयत्न करावे लागतात. या प्रवासात टीका सहन करून पुढे चालत राहावे लागते, असेही शास्त्री यांनी नमूद केले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply