Breaking News

ज्येष्ठ क्रीडा संघटक नथुराम पाटील यांचे निधन

अलिबाग ः प्रतिनिधी

राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडा संघटक नथुराम पाटील उर्फ भाऊ यांचे बुधवारी (दि. 10) पहाटे त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पच्छात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.नथुराम जानू पाटील यांचा जन्म अलिबाग तालुक्यातील हेमनगर येथे 16 जुलै 1939 रोजी झाला होता.एसएससीपर्यंतचे शिक्षण घेतल्यांनतर त्यांनी तांत्रिक प्रशिक्षण घेतले. त्यांनी ते रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष व कार्यवाहपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्याचबरोबर रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनचे कार्यवाह, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे  उपाध्यक्ष, रायगड जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे कार्यवाह, रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे कार्यवाह, महाराष्ट्र कॅरम असोसिएशचे प्रमुख कार्यवाह, रायगड जिल्हा सायकलिंग असोसिएशचे कार्यवाह, रायगड जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे  उपाध्यक्ष, रायगड जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे कार्यवाह, रायगड जिल्हा हौशी बेसबॉल असोसिएशनचे कार्यवाह ही पदेही भूषविली आहेत. जिल्हा क्रीडा परिषद आणि रायगड जिल्हा स्टेडियम समितीचे ते सदस्य होते. नथुराम पाटील रायगड जिल्ह्याचे क्रीडामहर्षि म्हणून ओळखले जायचे. त्यांनी क्रीडाक्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना शिवछत्रपती राज्य  क्रीडा पुरस्कार देऊन गौरविले. जिल्हा परिषदेचा रायगडभूषण पुरस्कार, राज्य शासनाचा क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार, यूआरएल फाऊंडेशनचा क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार, आगरी समाजरत्न पुरस्कार आदी पुरस्कार त्यांना मिळाले होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply