Breaking News

पोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे नुकसान

कर्जत : बातमीदार

नेरळ-कळंब रस्त्यावरील पोशिर या गावातील गणेश विसर्जन घाटाचे पोश्री नदीला आलेल्या महापुरात मोठे नुकसान झाले आहे. या महापुरामुळे गणेशघाटासह तेथील रस्त्याचेही नुकसान झाले आहे.

पोशिर गावातील गणेश विसर्जन घाट आणि दशक्रिया विधी घाट हा चिकनपाडा गावाच्या पुढे असलेल्या पोश्री नदीच्या तीरावर आहे. तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या या गणेश विसर्जन घाटाच्या आजूबाजूला पोश्री नदीला आलेल्या महापुराचे पाणी दिवसभर होते. त्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने गणेश घाटावर लावलेल्या सिमेंट पायर्‍या या पाण्यासोबत वाहून गेल्या. त्याच वेळी वादळी वार्‍याने घाटावरील पत्र्याच्या शेडचे नुकसान झाले आहे.

दुसरीकडे चिकनपाडा गावातून येणार्‍या रस्त्याची हानीदेखील महापुराच्या पाण्याने झाली आहे. रस्त्याची माती खाली असलेल्या शेतात जाऊन थांबली. त्यामुळे भातशेतीचे देखील नुकसान झाले आहे. याबाबत कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती आणि पोशिर गावचे ग्रामस्थ धोंडू राणे यांनी गणेश घाटाची दुरुस्ती करण्यासाठी शासनाने निधी देण्याची मागणी केली. त्याच वेळी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्याचीही मागणी केली आहे.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply