पनवेल : रामप्रहर वृत्त
येथील कृष्णाली कृष्णकांत जोशी या विद्यार्थिनीची शासनाच्या युवा संसद स्पर्धा कार्यक्रमात राज्यस्तरावर निवड झाली आणि तिने कौशल्य विकासमंत्री म्हणून काम पाहिले. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कृष्णालीचे विशेष कौतुक केले.
तरुणाईमध्ये समाजाविषयी जाणीव व जागृती व्हावी, महाराष्ट्र व देशाच्या विकासाबाबत युवक-युवतींनी विचार करावा, त्यांच्यात नेतृत्व व वक्तृत्वाचे गुण निर्माण व्हावेत या उद्देशाने राज्य क्रीडा व युवकसेवा संचालनालयातर्फे युवक कल्याण उपक्रमांतर्गत युवा जागर-महाराष्ट्रावर बोलू काही, या शीर्षकाखाली युवा संसद स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महात्मा स्कूलमध्ये इयत्ता बारावीत शिकणार्या कृष्णाली जोशी हिने सहभाग घेतला होता. तिने पनवेल तालुका स्तरावर प्रथम, तर रायगड जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यामुळे तिची राज्य स्तरावर निवड झाली.
राज्य पातळीवर निवडण्यात आलेले सर्व स्पर्धक विधानभवनात एकत्र आले. तेथे उपसचिव राजेंद्र पवार यांनी विद्यार्थी मंत्रिमंडळाची स्थापना केली. त्यात कृष्णालीची कौशल्य विकासमंत्री म्हणून निवड झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कडव यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार श्रीनिवास रेड्डी (रा. आंध्र प्रदेश), श्रीपाद राव (रा. हैदराबाद), बळवंत लोहार व अमृतलाल यादव (दोघे रा. भिवंडी) यांच्याविरोधात फसवणूक, अपहार, माहिती तंत्रज्ञान अधिनियम व महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितरक्षणाचा कायदा कलम 3, 4प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.