कर्जत : बातमीदार

ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या दोन जटिल गुन्ह्यांचा जलदगतीने तपास केल्याबद्दल रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बुधवारी (दि. 17) कर्जत पोलिसांच्या तपास पथकाचा विशेष सन्मान केला.
कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे गांजा तस्करी सुरू असल्याबाबतची खबर मिळताच कर्जतच्या पोलीस पथकाने अन्य जिल्ह्यात जाऊन तपास केला व आरोपींना अटक केली होती, तसेच कर्जत पोलिसांनी शहर आणि परिसरातील बाईकचोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. कोणतेही धागेदोरे नसताना कर्जत पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्यांची जलदगतीने केलेल्या तपासाची दखल रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली व बुधवारी अलिबाग येथील जिल्हा पोलीस मुख्यालयात झालेल्या क्राईम बैठकीत पोलीस अधीक्षक अशोक दुधे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी कर्जत पोलिसांच्या तपास पथकाचा सन्मान केला. या तपास पथकात कर्जत पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुवर्णा पत्की, सहाय्यक निरीक्षक आल्हाट, पोलीस कर्मचारी पाटील, देशमुख, कोळी, चौधरी, जमदाडे यांचा समावेश आहे.


