Breaking News

भिवपुरी रोड रेल्वे संघटनेकडून प्रवासी वर्धापन दिन उत्साहात साजरा

कर्जत : बातमीदार

मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड स्थानकात बुधवारी (दि. 17) रेल्वे प्रवासी संघटनेचा दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वेळी स्थानकातील महापुरुषांच्या प्रतिमांना आणि भिवपुरी रोड रेल्वे स्टंटाईन नावाच्या फलकाला पुष्पहार घालण्यात आला.

कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेचा दुसरा वर्धापन दिन बुधवारी प्रवाशांना मिठाई वाटून साजरा करण्यात आला. त्या वेळी संघटनेचे अध्यक्ष किशोर गायकवाड, कार्यध्यक्ष गणेश मते, खजिनदार महेश कडव, सचिव विनोद बार्णकर, सल्लागार उत्तम गायकवाड, अशोक गायकवाड, रवींद्र राऊत, जीवक गायकवाड, माधव चव्हाण, पंकज बुंधाटे, तेजस तुपे, स्टेशन मास्तर सुरेश कुमार, हिरा खामगर, संतोष जाधव, कोमल पांचाळ, महेंद्र परदेशी यांच्यासह प्रवासी उपस्थित होते.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply