पनवेल : रामप्रहर वृत्त
तालुक्यातील कराडे खुर्द ग्रामपंचायत निधीमधून कराडे खुर्द येथे स्मशानभूमीजवळ निवारा शेड उभारण्यात आले आहे. या निवारा शेडचे उद्घाटन प्रभारी सरपंच यशश्री योगेश मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सदस्य नलिनी कारंदे, मीनल ठोंबरे, मुकेश पाटील, प्रमिला पाटील, माधुरी चितळे, रेवती भोईर, नितेश कारंदे, संतोष म्हात्रे, तसेच माजी सरपंच विजय मुरकुटे, बंडू मोडक, योगेश मुरकुटे, राजेश कारंदे, विशाल मुरकुटे, योगेश पाटील, प्रशांत चितळे, सीताराम माळी, चंद्रकांत पाटील, सचिन माळी, कृष्णा पाटील, ग्रामसेवक निवृत्ती आंधळे यांच्यासह कर्मचारी वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते.