
नवी दिल्ली ः 100 कोटींच्या वसुली प्रकरणामध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत आहेत. सीबीआय तपासाचा अहवाल तपासणीसाठी न्यायालयाच्या समोर ठेवण्याची मागणी करणारी देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तपास यंत्रणांना त्यांनी केलेल्या चौकशीची माहिती निरीक्षणासाठी कोर्टासमोर ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी देशमुख यांनी याचिका दाखल करून केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने ती फेटाळली, तसेच देशमुखांना याबाबत संबंधित कोर्टात जाण्याची परवानगी दिली आहे.