Breaking News

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची पेन्शन प्रक्रिया ऑनलाइन करा

नगरसेविका रूचिता लोंढे यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची पेन्शन प्रक्रिया डिजिटिल अथवा ऑनलाइन पद्धतीने करण्याची मागणी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल मनपाचे शिक्षण प्रशासन अधिकारी बाबासाहेब चिमणे यांना निवेदन दिले आहे.

नगरसेविका लोंढे यांनी निवेदनात म्हटले की, पनवेल महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी हे नगर परिषदेपासून कामकाज करीत होते ते आजपर्यंत त्यातील काही कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर पुढील भविष्याकरिता सरकारमार्फत पेन्शन दिली जाते, परंतु या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना पेन्शन प्रकियेकरिता पालिकेमध्ये येऊन सर्व कागदपत्राची पूर्तता करणे, तसेच त्यांना मिळणारा थकबाकी असणे, सातवा वेतन आयोग मिळणे, महागाई भत्त्यातील फरक मिळणे अशा प्रकियासंदर्भात या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सारख्या फेर्‍या माराव्या

लागतात. त्यामध्ये काहींना तर उतारवयात चालणे व पहिला मजला चढ-उतार करणे शक्य नसते, अशा परिस्थितीत सुद्धा त्यांना पेन्शनप्रकियेसाठी यावे लागत आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटिल इंडिया या संकल्पेनतून पनवेल महापालिकेने सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन प्रक्रियेसंदर्भात डिजिटिल अथवा ऑनलाइन पद्धतीने फॉर्म व त्यासंदर्भातील सर्व प्रकिया ऑनलाइन पद्धतीत केल्यास सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना होणारा त्रास कमी होईल. पनवेल महानगरपालिकेच्या कामकाजात आधुनिकता दिसुन येईल. ही बाब लक्षात घेऊन, पनवेल महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची पेन्शन प्रक्रिया डिजिटिल अथवा

ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत संबधित विभागास आदेशित करण्यात यावे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply