Breaking News

पनवेल, उरणमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

संभाव्य लॉकडाऊनचे सर्वत्र सावट

पनवेल : वार्ताहर

दोन दिवसांचा वीकेण्ड लॉकडाऊन संपल्यानंतर सोमवारी व मंगळवारी पनवेल परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दीच गर्दी दिसून आली. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहने दिसून येत होती. तर पनवेलमध्ये प्रत्येक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. लॉकडाऊनच्या भीतीने नागरिकांनी मिळेल त्या वस्तू विकत घ्यायला तोबा गर्दी केली होती.

शहरातील बाजारपेठेतील फ्रुट मार्केट, मच्छी मार्केट, उरण नाका, टपाल नाका, ठाणा नाका, चिकन विक्रेते आदी ठिकाणी झालेली गर्दी बघून कोरोना संपला की काय अशी शंका आली. या सोमवारी विकेंड लॉकडाऊन संपल्यानंतर खरेदीदारांची अक्षरशः झुंबड उडाली. सध्या कोरोनाची भयावह परिस्थिती आहे. आतापर्यंत पनवेल महापालिका हददित दररोज 500 हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडून येत आहेत. तर काही रुग्णांचा मृत्यू देखील होत आहे. कोरोना संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला. अशातच नागरिकांची होणारी ही गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी आहे.

प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केल्यास कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल, असे वारंवार प्रशासनकडून वारंवार सांगितले जात आहे, मात्र काही नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे हजारोंचे जीव पुन्हा धोक्यात येत आहेत. पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार या भीतीपोटी मिळेल त्या वस्तु घेण्यासाठी नागरिकानी गर्दी केल्याचे दिसून आले. शहर आणि तालुक्यात सध्या हजारोंच्या संख्येने अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे एकीकडे लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. पनवेल शहरातच नाही तर जिल्ह्यातदेखील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या गतीने वाढत आहे.

उरण : वार्ताहर

लॉकडाऊन लागण्याच्या शक्यतेने जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी उरणमध्ये नागरिकांनी बाजारात गर्दी केली होती. खरेदीच्या ओघात पोलीसांच्या आवाहनाकडेही दूर्लक्ष होत होते.

नागरिकांची गर्दी किराणा दुकानांवर राशन खरेदी करण्यासाठी, तर रस्त्यांवर असलेल्या भाजीच्या दुकानांवर, मच्छी, चिकनची दुकाने येथेही दिसत होती. त्याचबरोबर बँकेतही गर्दी दिसत होती. यासंदर्भात उरण पोलीस पोलीस कोरोना नियम पाळण्याबाबत नागरिकांना सुचनाही देत होते, परंतू खरेदीत गूंग झालेल्या नागरीकांचे मात्र त्याकडे दूर्लक्ष होताना दिसत होते. असे असले तरी सर्व नागरिकांनी मास्क घातलेला होता.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply