कामोठे : रामप्रहर वृत्त
नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या पाठपुराव्यामुळे कामोठे येथील शुभम सोसायटी परिसरात असणार्या समस्या सोडविण्यात आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी चिपळेकर यांचे आभार मानले आहेत.
कामोठ्यातील शुभम सोसायटी प्लॅाट न.53 सेक्टर 6- येथील रहिवासी सोसायटी समोरील रस्त्यावरील खड्डे आणि सिडकोकडून होत असलेला अपुरा पाणीपुरवठा या समस्यांनी गेल्या काही दिवसांपासून त्रस्त झाले होते. सोसायटीचे अध्यक्ष आनंद मोरे, सेक्रेटरी संदीप पवार, सदस्या स्वरा परब यांनी नगरसेवक विजय चिपळेकर यांची भेट घेऊन सोसायटीच्या समस्या दूर करण्याची मागणी केली. नगरसेवक चिपळेकर यांनी रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन या मागणीची तत्काळ दखल घेत सिडकोकडे या समस्येचा पाठपुरावा केला. त्यानुसार चिपळेकर यांच्या पाठपुराव्यामुळे सिडकोच्या माध्यमातून शुभम सोसायटी समोरील रस्त्यावरील खड्ड्यांचे डांबरीकरण कार्य पूर्ण करण्यात आले. तसेच सोसायटीला होणारा कमी पाणीपुरवठा याबाबत जोपर्यंत सिडकोकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत दररोज दोन टँकर पाणीपुरवठा केला जाईल, अशी व्यवस्था केली. दररोज होणार्या त्रासापासून नगरसेवक चिपळेकर यांच्या पाठपुराव्यामुळे सुटका झाल्याची भावना शुभम सोसायटीच्या रहिवाशांनी व्यक्त केली.