मुंबई : राज्यभरात मागील 20 दिवसांपासून एसटी कर्मचार्यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावी ही कर्मचार्यांची प्रमुख मागणी आहे. संपामुळे राज्यातील बसेस सध्या संथ गतीने सुरू आहेत. त्यातच मुंबईतील आझाद मैदानावर कर्मचार्यांनी ठिय्या दिला आहे. दरम्यान, एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील महामंडळाच्या मुख्यालयात परिवहनमंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर, कर्मचारी संघटनेच्या वतीने हायकोर्टात बाजू मांडणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते हेदेखील उपस्थित होते, मात्र याही बैठकीत सन्मानजनक तोडगा निघू शकला नाही. महाविकास आघाडी सरकारसोबत आणखी एक बैठक निष्फळ ठरल्यानंतर संपकर्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …