Breaking News

चिंध्रणच्या सरपंच कमला देशेकर यांचा महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार

बचत गटातून प्रगतीचा मार्ग

तळोजा : रामप्रहर वृत्त

चिंध्रण ग्रामपंचायत हद्दीतील महिलांना बचत गटाचा मार्ग दाखवत सरपंच कमला एकनाथ देशेकर यांनी येथील महिलांना प्रगतीचा मार्ग दिला.

जवळपास 24 बचतगट सुरू करून ग्रामपंचायत हद्दीत सरपंच कमला देशेकर यांच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने होत असलेले महिला सबलीकरण कौतुकास्पद आहे. प्रत्येक बचत गटाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 15 हजाराचे आर्थिक साह्य केले आहे. महिलांसाठी शिवण क्लास सुरू करून रोजगार उपलब्ध करून देण्याचे मोलाचे काम त्यांनी केले.

पनवेल तालुक्यातील चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच कमला एकनाथ देशेकर यांनी संपूर्ण गावात सुविधा पोहचवत आदर्श सरपंच म्हणून गाडगे महाराज पुरस्कार पटकाविला आहे. भाजप नेते एकनाथ देशेकर यांच्या पत्नी कमला देशेकर ह्या पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करत गावकर्‍यापुढे सरपंच कसा असावा याचा आदर्श ठेवला आहे. शिक्षणावर भर देत गावात आता तिसरी अंगणवाडी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या अंगणवाडीतील चिमुकल्यांचे आरोग्य जपताना त्यांना फिल्टर केलेल्या पाण्याची व्यवस्था केली आहे.

गावातील रस्त्यांवर अतिक्रमण होवून गावातील रस्ते गायब होत आहेत. ही दूरदृष्टी ठेवून संपूर्ण चिंधण गावात रस्त्याचे रुंदीकरण करताना रस्तांचे काँक्रिट करण्यात आले आहे. संपूर्ण गावात गटारे काढण्यात आली असून त्यांचे काँक्रिटिकरण करण्यात आले आहे. गावासाठी शुद्ध पाणी प्रकल्प राबविण्यात आला असून दररोज 8000 लिटर मोफत पाणीपुरवठा करण्यात येतो. शेतकर्‍यांना शेतीचे पीक योग्य प्रकारे व आधुनिक पद्धतीने घेता यावे म्हणून बोअरवेल देत मोटारचेही वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे या गावातील शेतकरी शेतीला प्रथम प्राधान्य देत आहे.

चिंध्रण गावाला लागून गावकर्‍यांच्या जमिनीवर आयटी पार्क येत असून गावातील तरुणांना त्यात रोजगार मिळावा म्हणुन त्याप्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न असणार आहे. त्याच बरोबर गावाच्या एक किलोमीटरच्या अंतरावर तळोजा एमआयडीसी वसलेली असल्याने त्यात जास्तीत जास्त तरुणांना रोजगार कसा मिळेल. यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न असणार आहेत.

सर्वच महिलांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना आर्थिक मदत म्हणून 15 हजार रुपयांची ग्रामपंचायतीमधून तरतूद केली. त्यानंतर बँक ऑफ इंडियाकडून दोन लाख रुपये कर्ज मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. गावाच्या दोन किलोमीटर अंतरावर तळोजा औद्योगिक वसाहत असल्याने सुशिक्षित महिलांना कारखान्यात काम देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. महिलांसाठी मोकळ्या जागेत व्यायाम शाळा सुरू करण्यात आली असून त्यासाठी त्यांना आवश्यक ती माहिती उपलब्ध होत आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून व गावाला लागून येणार्‍या औद्योगिक विभागाचा विचार करून गावात दोन पाण्याच्या टाक्या असताना तिसरी टाकी उभारण्याचे काम सुरू आहे. गावात लवकरच शाळेची नवीन इमारत उभी करण्याचा त्यांचा मानस आहे.

गावात 100 टक्के लसीकरण होण्यासाठी प्रत्येकाच्या घरी जाऊन किंवा आशा नर्सच्या मदतीने गावाचे प्रथम लसीकरण करण्याचा मान कमला देशेकर यांचा आहे. पंधरा दिवसांत घनकचरा प्रकल्प उभा करून त्यातून वीजनिर्मित करण्याचा देशेकर यांचा प्रयत्न असून त्यात आम्ही यशस्वी होवू, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply