कर्जत : बातमीदार
कृषिरत्न तसेच कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी शेखर भडसावळे (नेरळ, ता. कर्जत) यांना वंदे मातरम संस्थेने वंदे मातरम किसान सन्मान पुरस्कार जाहीर केला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते भडसावळे यांना हा सन्मान राजभवन येथे 1 डिसेंबर रोजी होणार्या कार्यक्रमात सन्मानपूर्वक दिला जाणार आहे.
चंद्रशेखर हरिभाऊ भडसावळे यांनी देशात कृषी पर्यटन संकल्पना प्रत्यक्षात आणली. महाराष्ट्र कृषी विभागाने 1996 मध्ये कृषी भूषण पुरस्काराने त्यांना सन्मनित केले होते, तर 2019 मध्ये कृषी विभागाने कृषी क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या कृषिरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. वंदे मातरम या संस्थेचे शिवाजी फुलसुंदर, अनिरुद्ध हजारे, प्रसाद कुलकर्णी यांनी या वर्षीच्या वंदे मातरम किसान सन्मान पुरस्काराने गौरव करण्याचे निश्चित केले आहे. 1 डिसेंबर रोजी मुंबई येथील राजभवन येथे हा सन्मान सोहळा होणार असून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केले जाणार आहे.