Breaking News

नेरळमध्ये महायुतीची प्रचारात आघाडी

मतदार बारणेंना भरभरून मतदान करतील, किसन शिंदे यांचा विश्वास

कर्जत : बातमीदार

मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार यांच्या प्रचारासाठी कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागात महायुतीचे कार्यकर्ते पोहचत असून, शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. नेरळ गावात महायुतीकडून नियोजनबद्ध प्रचार सुरू असून श्रीरंग बारणे यांना मोठी आघाडी देण्याचा निर्धार शिवसेना संपर्कप्रमुख किसन शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

नेरळमध्ये मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहणारे आणि 100 टक्के सुशिक्षित मतदारांचा भरणा आहे. ते लक्षात घेऊन कोणताही गाजावाजा न करता प्रचार करण्याचे नियोजन रायगड जिल्हा परिषदेचे माजी पक्षप्रतोद सावळाराम जाधव, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते नितीन कांदळगावकार, आरपीआयचे कोकण प्रदेश सचिव मारुती गायकवाड आणि शहर संपर्कप्रमुख किसन शिंदे, शहरप्रमुख रोहिदास मोरे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यानुसार ग्रामपंचायत हद्दीमध्ये प्रचारावर लक्ष केंद्रित करून घरोघरी मोदी सरकारची बाजू पोहचली पाहिजे याची खबरदारी घेण्यात येत आहे. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रात नेरळमध्ये बारणे यांच्या विजयासाठी प्रचार सुरू असून, नेरळमधील प्रत्येक घरात शिवसेना, भाजप, आरपीआयचे कार्यकर्ते पोहचले आहेत. महिलांचा असलेला प्रचंड सहभाग आणि त्यात युवकांचा असलेला सहभाग यामुळे युतीचा प्रचार घरोघरी पोहचला असल्याचे नेरळ शिवसेना संपर्कप्रमुख किसन शिंदे यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाचे व्हिडीओग्राफर यांच्यासह आम्ही मतदारांच्या घरी जाऊन प्रचार करताना सरकारची भूमिका पटवून दिली, या प्रचाराच्या काळात सर्व मतदार स्वागत करीत होते हे सर्वांनी पाहिले आहे. बंद पडलेली मिनीट्रेन पुन्हा सुरू करण्यात आपल्या खासदारांची भूमिका मतदारांना अधिक भावत आहे. त्याच वेळी शेलू, नेरळ, भिवपुरी रोड आणि कर्जत रेल्वे स्थानकात सुरू असलेली विकासकामे यांचे स्वागत रेल्वे प्रवासी करताना दिसत आहेत. अशा प्रकारे सुरू असलेला प्रचार लक्षात घेता खासदार श्रीरंग बारणे यांना नेरळमध्ये मोठी आघाडी मिळेल यात शंका नाही, आसा विश्वास किसन शिंदे यांनी व्यक्त केला आहे. नेरळ गावातील प्रचार मोहिमेत शिवसेना, भाजप आणि आरपीआय या तिन्ही पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते सहभागी होत असून त्यात कर्जत पंचायत समितीच्या सदस्या सुजाता मनवे, नेरळच्या सरपंच जान्हवी साळुंखे, भाजपच्या जिल्हा चिटणीस समिधा टिल्लू, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मृणाल खेडकर, तालुका उपाध्यक्ष वर्षा बोराडे, भाजप तालुका सरचिटणीस प्रवीण पोलकम, शहर अध्यक्ष अनिल जैन, महिला शहर अध्यक्ष नीता कवाडकर, युवा मोर्चा अध्यक्ष हेमंत मिस्त्री, शिवसेना महिला आघाडी उपतालुका संघटक सुमन लोंगले, उपशहर प्रमुख बंडू क्षीरसागर, आरपीआय महिला तालुका अध्यक्ष सुरेखा चिकणे, नेरळ शहर अध्यक्ष बाळा संदानशिव, अनिल सदावर्ते, युवासेनेचे विधानसभा मतदारसंघ सचिव प्रथमेश मोरे, ग्रामपंचायत सदस्य केतन पोतदार, मीना पवार यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते प्रचारात सहभागी होऊन मार्गदर्शन करीत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply