ठाकरे सरकारवर भाजपचा निशाणा
मुंबई ः प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केले, तेव्हा राज्याने आपले कर कमी करावेत, अशी मागणी आम्ही केली, पण ते ठाकरे सरकारला ऐकायलाच गेले नाही, मात्र आता विदेशी दारूच्या किमती 50 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला. पब, पार्टी आणि पेग.. गुड गोईंग!, असे आशिष शेलार यांनी ट्विट करून म्हटले आहे.
‘गांजा ओढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा’
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही राज्य सरकारचा समाचार घेतला आहे. ‘महाराष्ट्र सरकारने दारूवरची एक्साईज ड्युटी 150 टक्क्यांनी कमी केली. हर्बल गांजा ओढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा, असा महाविकास आघाडी सरकारचा अजब कारभार सुरू आहे. एक्साइज ड्युटी कमी करून आता सरकारने दारू पिण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याचे काम हातात घेतले आहे,’ अशी उपरोधिक टीका खोत यांनी केली आहे.