Breaking News

काँग्रेसच्या पदयात्रेत मानापमान नाट्य

कल्याण : प्रतिनिधी

महागाईच्या विरोधात काँग्रेसने संपूर्ण राज्यात जनजागरण पदयात्रा सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वातील ही पदयात्रा रविवारी (दि. 21) कल्याणमध्ये काढण्यात आली होती, मात्र या यात्रेत मानापमान नाट्य रंगले. काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी या पदयात्रेवर बहिष्कार टाकल्याने काँग्रेसमधील सुंदोपसुंदी उघड झाली आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वात कल्याणमध्ये जनजागरण पदयात्रा आली होती, मात्र सेवा दलाने या पदयात्रेवर बहिष्कार टाकला आहे. रॅलीत प्रोटोकॉल पाळला जात नाही. केवल दादागिरी सुरू आहे, असा आरोप करत काँग्रेस सेवादल कार्यकर्त्यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. 

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply