Breaking News

राज्यस्तरीय सिनियर तायक्वांडो स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त

ग्रीन पेरडाइस रिसोर्ट अर्नाळा विरार-वसई, पालघर येथे 3 ते 5 डिसेंबर रोजी होणार्‍या राज्यस्तरीय सिनियर तायक्वांडो स्पर्धेसाठी रायगडचा संघ संघटनेचे अध्यक्ष सदानंद निंबरे व सचिव सुभाष पाटील यांनी जाहीर केला आहे.

मुलांच्या संघात (क्युरोगी प्रकार) शाकीब शेख (54 कीलो खालील), रवी चव्हाण (58 किलो खालील), शुभम पोवार (63 किलो खालील), तुषार सिनलकर (68 किलो खालील), विशाल सानप (74 किलो खालील), विराज कुडावकर (80किलो खालील), प्रवीण पाटील (87 किलो खालील), दर्शन नाईक (87 किलो वरील) संघ प्रशिक्षक निलेश जाधव, संघ व्यवस्थापक रोहित सिनलकर आहे.

मुलींच्या संघात (क्युरोगी प्रकार), नुपूर पावगे (46 कीलो खालील), अपूर्वा देसाई (49 किलो खालील), मधुरा दरेकर (53 किलो खालील), रविना ननावरे (57 किलो खालील), गौरी पाटील (62 किलो खालील), अनुष्का लोखंडे (67 किलो खालील), भविशा पटेल (73 किलो खालील), दीप्ती पांगम (73 किलो वरील) संघ प्रशिक्षिका प्राजक्ता अंकोलेकर आहे.

पुमसे प्रकारात वैयक्तिक खेळ खेणार्‍या खेळाडूंची नावे निलेश जाधव (30 वर्ष खालील), नुपूर पावगे (30 वर्ष खालील), प्राजक्ता अंकोलेकर (30 वर्षावरील); जोडी प्रकारात तुषार सिनलकर आणि नुपूर पावगे तर ग्रुप प्रकारात मुलांमध्ये निलेश जाधव, तुषार सिनलकर व शुभम पोवार आणि मुलींमध्ये प्राजक्ता अंकोलेकर, मुग्धा भोसले व दीप्ती पांगम हे असून संघ प्रशिक्षक प्रभाकर भोईर, संघ व्यवस्थापक अक्षय पवार आहेत.

या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू राष्ट्रीय सिनियर तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. या सर्व खेळाडूंचा 20 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत रोज 8 ते 10 तास सराव सुरू आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply