Breaking News

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राऊत हे पत्राचाळ घोटाळाप्रकरणी सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत.
पत्राचाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक होती. म्हाडानेही त्यास तयारी दाखवत विकसक आणि सोसायटीसमवेत करारनामा केला. या अंतर्गत मूळ रहिवाशांचे मोफत पुनर्वसन केल्यानंतर उपलब्ध होणार्‍या बांधकामामध्ये विकसक आणि म्हाडामध्ये समान हिस्सा राहणार होता, मात्र या जागी बांधलेली घरे काही व्यावसायिकांना वाटून देण्यात आली आणि त्यातून प्रवीण राऊतांनी तब्बल 1,074 कोटी रुपये जमविले. यानंतर हे पैसे प्रवीण राऊत यांनी त्यांचे मित्र आणि निकटवर्तीयांच्या खात्यात वळते केले. यातील 83 लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊतांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यात जमा केले. त्याच रकमेतून वर्षा राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट घेतल्याचा आरोप आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply