Breaking News

गव्हाण विद्यालयात अरुणशेठ भगत यांचे अभीष्टचिंतन

नवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आणि रयतच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयामध्ये अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला.

शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी, ज्येष्ठ नेते जयवंतराव देशमुख, गव्हाण ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय घरत, वसंतशेठ  पाटील तसेच विद्यालयाच्या प्राचार्य साधना डोईफोडे यांच्या हस्ते अरुणशेठ भगत यांना पुष्पगुच्छ, स्नेहवस्त्र व भेटवस्तू प्रदान करून शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी स्थानिक शाळा समितीचे सदस्य विश्वनाथ कोळी, अ‍ॅड. रुपेश म्हात्रे यांनी आपल्या भाषणात अरुणशेठ भगत यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.

अरुणशेठ भगत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना या विद्यालयाचा माजी विद्यार्थी असतानाच्या काही शालेय आठवणींना उजाळा दिला. आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील घटनांचा उल्लेख करून भावना व्यक्त केल्या.

या वेळी गव्हाण ग्रामपंचायत सदस्य कामिनी कोळी व उषा देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य स्नेहलता ठाकूर, अनिता ठाकूर व पूर्वा वास्कर, किशोर पाटील, कॅनरा बँक उलवे शाखेचे शाखाधिकारी साकेत सौरभ, विभागीय व्यवस्थापिका अंजली लोखंडे, बँक अधिकारी किर्ती पाटील, उपमुख्याध्यापक जगन्नाथराव जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, राजेंद्र देशमुख, सुधीर ठाकूर, सदानंद देशमुख, आशीष घरत, रयतचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी, लाईफ वर्कर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे, मोरु नारायण म्हात्रे विद्यालय व टी. एन. घरत ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या गोळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्योत्स्ना ठाकूर यांनी केले.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप

पनवेल : रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय आणि ज. आ. भगत जुनिअर कॉलेजच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त कॅनरा विद्या ज्योती या योजनेंतर्गत कॅनरा बँक उलवे शाखेच्या वतीने मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये बँकेचा हातभार लावण्यासाठी शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.

विद्यालयातील अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील गतवर्षीच्या वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थिनींना प्रत्येकी पाच हजार रुपयांची विशेष शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी ते दहावी) तर प्रत्येकी अडीच हजार रुपये (पाचवी ते सातवी) अशा एकूण 22 हजार 500 रुपयांच्या शिष्यवृत्ती विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत, कॅनरा बँक उलवे नोड शाखेचे शाखाधिकारी साकेत सौरभ आणि बँकेच्या विभागीय व्यवस्थापिका अंजली लोखंडे व बँक अधिकारी कीर्ती पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

शिष्यवृत्तीच्या लाभार्थी विद्यार्थिनींमध्ये पूजा कांबळे, वैष्णवी सोनकांबळे, अक्षरा गायकवाड, संजना पंडीने, साक्षी आव्हाड, रिंकी जोंधळे यांचा समावेश होता. कॅनरा बँकेच्या विभागीय व्यवस्थापिका अंजली लोखंडे यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करतानाच कॅनरा बँकेच्या वतीने राबविण्यात येणार्‍या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात अरुणशेठ भगत यांनी कॅनरा बँकेच्या वतीने कॅनरा विद्या ज्योती या योजनेंतर्गत विद्यार्थिनींना दिलेल्या शिष्यवृत्तीबद्दल बँकेचे विशेष आभार व्यक्त केले. या वेळी विद्यार्थिनींचे पालक उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply