Breaking News

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व अरुणशेठ भगत यांचे वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 22) विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि हितचिंतकांनी अभिष्टचिंतन केले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अरुणशेठ भगत गेल्या 50वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांचे अत्यंत जवळचे ते विश्वासू सहकारी असून समाजातील तळागाळात सुपरिचित आहेत. लोकांच्या सुखदुःखात धावून जाणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. त्यामुळे अरुणशेठ भगत यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शभेच्छांचा वर्षाव केला. लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, महापौर डॉ. कविता चौतमोल, शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृह नेते परेश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील यांच्यासह नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी अरुणशेठ भगत यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करून त्यांना निरोगी व उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply