Breaking News

खोपोली चिंचवलीत पाच दुकाने फोडली

खोपोली : प्रतिनिधी

नगरपालिका हद्दीतील चिंचवली शेकीन येथे आयटीआय समोरील इमारतीतील चार ते पाच दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. दुकानदारांनी याबाबत तक्रारच दिली नसल्याने, किती माल चोरीस गेला हे समजू शकले नाही. यासंदर्भात पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्याशी संपर्क साधला असता, घटना घडल्याबाबत दुजोरा दिला, मात्र काहीच माल चोरीस गेला नसल्याने त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनीही या परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी पुढे येत आहे.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply