Breaking News

राजपत्रित अधिकारी महासंघाची कोकण भवन समन्वय समिती जाहीर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कोकण भवन समन्वय समितीच्या अध्यक्षपदी माहिती व जनसंपर्क विभागाचे कोकण विभागीय उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांची निवड झाली आहे. ही घोषणा महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी बुधवारी (दि. 24) येथे केली. महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सन 2021-2023ची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यामध्ये कार्याध्यक्षपदी राज्यकर विभागाचे उपायुक्त कमलेश नागरे, सचिवपदी सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश धुमाळ, खजिनदारपदी राज्यकर विभागाचे सहायक आयुक्त सुबोध लवटे, उपाध्यक्षपदी सिडकोचे उपजिल्हाधिकारी संदीप माने, लेखा व कोषागारे सहसंचालक अनुदीप दिघे, दक्षता व गुण नियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता ए. एस. टोपले, अधीक्षक अभियंता एस. जी. शेलार यांची निवड झाली. याशिवाय अन्यही नियुक्त्या करण्यात आल्या. या बैठकीस कोकण भवनमधील सर्व विभागांचे राजपत्रित अधिकारी उपस्थित होते.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply