Breaking News

लघुपट स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वसंपन्न कारकिर्दीवर आधारित ‘कर्मयोगी नमो’या लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या, तसेच या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे. कर्मयोगी नमो या स्पर्धेतील लघुपट 1 मिनिट ते 12 मिनिटांचे असतील, तसेच या लघुपटांना भाषेचे बंधन नसेल. स्पर्धकांना प्रथम क्रमांक 75 हजार, द्वितीय 51 हजार, तृतीय 31 हजार, तर पाच उत्तेजनार्थ प्रत्येकी 15 हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. या वेळी सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, प्रदेश सदस्य सुनील सिन्हा, कोकण विभाग सहसंयोजक अक्षया चितळे, उरण संयोजक मनोहर जामकर, सहसंयोजक गणेश जगताप, पनवेल शहर संयोजक संजीव कुलकर्णी, तालुका संयोजक मंगेश वाकडीकर, निखिल गोरे, श्वेता कुलकर्णी, अनुराधा शिंदे उपस्थित होते. स्पर्धकांनी तयार झालेला लघुपट 5 डिसेंबर 2021 पर्यंत परोज्ञरीारूेसळऽसारळश्र.लेा या ई-मेलवर पाठवायचा आहे. या संदर्भात उत्तर रायगड जिल्ह्यासाठी अभिषेक पटवर्धन 9029580343 व निखिल गोरे 8097248877 यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती अभिषेक पटवर्धन यांनी दिली. 

Check Also

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी पुन्हा एकदा …

Leave a Reply