Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते खारघरमध्ये जनसंवाद कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कर्नाळा बँकेत घोटाळा केल्यामुळे गुन्हेगाराला शिक्षा मिळाली आहे. त्यामुळे जर काही वाईट कराल तर ते याच जन्मात भोगावे लागते, असे परखड प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 5) खारघर येथे केले.
भारतीय जनता पक्षाचे खारघर तळोजा मंडल उपाध्यक्ष तथा माजी उपसरपंच संजय घरत यांच्या जनसंवाद कार्यालयाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात अनेक तरुणांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक हरेश केणी, शत्रुघ्न काकडे, प्रवीण पाटील, रामजी बेरा, भटके विमुक्त मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, भाजप खारघर सरचिटणीस दीपक शिंदे, किर्ती नवघरे, नाना घरत, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गीता चौधरी, मोना अडवाणी, संध्या शारबिद्रे, बिना गोगरी, महिला मोर्चा खारघर अध्यक्ष वनिता पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत, अमर उपाध्याय, अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव मन्सूर पटेल, किरण पाटील, नवनीत मारू, ओबीसी मोर्चाचे खारघर अध्यक्ष सुरेश ठाकूर, विपूल चौटालिया, गुरूनाथ म्हात्रे, राजेंद्र मांजरेकर, संदीप रेड्डी, लखबीरसिंग सैनी, किरण पाटील, सुनीत सहाय, सुजित पांडे, फुलाजी ठाकूर, निर्मला यादव, सीमा खडसे, अक्षय पाटील, सस्मित डोळस, आशिष भोईर, यतीन बारसे, सिद्धी घरत, कावेरी डोळस, दिलीप बिष्ट, विजय उजळंबे, विजय बगाडे, रमेश खेडकर, शुभ पाटील, शोभा मिश्रा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास या सूत्राने सर्वांना बरोबर घेऊन काम करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर व सगळे एकत्र येऊन काम करीत आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही आघाड्या केल्या तरी त्यांची टाप येथे चालणार नाही.
सिडकोने अजून बर्‍याच सुविधा महापालिकेकडे हस्तांतरित केलेल्या नाहीत, पण ज्या सुविधा दिल्या त्यांचे सोने केले असल्याचे सांगत चांगली कामे करता येत नसतील तर वाईट कामेही नका करू, असा सल्ला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विरोधकांना दिला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप एकजूट होऊन पनवेलसह उत्तर रायगडात जोमाने काम करीत आहेत. या जनसंवाद कार्यालयातूनही नक्कीच चांगली कामे होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. आघाडी सरकार जे सत्तेमध्ये बसले आहे त्यांना जनतेच्या हिताचे काही घेणेदेणे नसून स्वतःमध्ये मग्न असलेले हे सरकार आहे. शेतकरी कामगार पक्षाने विवेक पाटलांची अटक टळावी म्हणून महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे, मात्र 60 हजार ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे खाल्ल्यामुळे 15 जूनपासून विवेक पाटील तुरूंगात आहेत. पैशांची अफरातफर केली म्हणून ईडीने कारवाई करीत त्यांना अटक केली. अशी कारवाई पोलीस कधी कारवाई करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महापालिकेच्या स्थापनेसाठी विरोधकांनी विरोध केला. त्यासाठी कोर्टात गेले. नंतर घनकचरा सेवा कशाला द्यायला पाहिजे यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे आरोप भाजपवर केले, परंतु आता संपूर्ण देशात घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत पनवेल महापालिकेने पुरस्कार पटकावून मान उंचवण्याचे काम केले. त्यामुळे विरोधक फक्त जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत हे सिद्ध झाले, असा आरोपही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून भाजपच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रथमेश सरडेकर, चेतन जाधव, विवेक जाधव, वैभव कोडग, विशाल माईंगडे, अशोक जाधव, सुनील पाटील, दादा कोळेकर, विपूल कदम, संकेत कदम, गौतम कदम, पवन मोरे, चंद्रमणसिंह ठाकूर, अप्सर खान, अनिकेत पाटील, अमर लोंढे या तरुणांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व उपस्थित अन्य मान्यवरांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply