Breaking News

माणगावमध्ये स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी दौड

माणगाव : प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. 8) अमृत महोत्सवी दौड व प्रभात फेरी काढण्यात आली होती. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभियानांतर्गत हर घर तिरंगा उपक्रम देशभर राबविण्यात येणार असून हे अभियान माणगावात 13ते 15ऑगस्ट दरम्यान यशस्वीपणे राबविण्यासाठी माणगावकर सज्ज झाले आहेत. माणगाव नगरपंचायत पाठोपाठ माणगाव पोलीस ठाण्यातर्फे  याबाबतीत जनजागृती करण्यासाठी सोमवारी अमृत महोत्सवी दौड व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. माणगाव प्रांत कार्यालय परिसरात नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या हस्ते या दौड व प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला. प्रांत कार्यालय येथून काढण्यात आलेली ही  जनजागृती दौड व प्रभातफेरी मुंबई-गोवा महामार्ग, मोर्बा रोड मार्ग, नवीन बसस्थानक, निजामपूर रोड, कालवा रोड मार्गे पुन्हा प्रांत कार्यालयात आली. तळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. ओमासे, गोरेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. नावले यांच्यासह रायगड पोलीस दल, एनसीसी पथक गोरेगाव, रायगड पोलीस दलाचे बँड पथक, अशोकदादा साबळे विद्यालयाचे विद्यार्थी, छत्रपती करिअर अकॅडमी आर्मी व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थी, शिक्षक, लोकप्रतिनिधी, नागरिक  या दौड व प्रभात फेरीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Check Also

‌‘एसआयआर‌’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …

Leave a Reply