पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात बुधवारी
(दि. 8) 124 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 150 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 93 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 117 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 31 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 33 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महापालिका कामोठे मधील दोन आणि खांदा कॉलनीतील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये कळंबोलीत 11 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 525 झाली आहे. कामोठे मध्ये 28 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 747 झाली आहे. खारघरमध्ये 16 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 637 झाली आहे . नवीन पनवेल मध्ये 16 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 502 झाली आहे. पनवेलमध्ये 17 नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णाची संख्या 600 झाली आहे. तळोजा मध्ये पाच नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 154 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 3165 रुग्ण झाले असून 1914 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60.47 टक्के आहे. 1163 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 88 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांत उलवे सहा, सोमाटणे पाच, करंजाडे तीन, कोप्रोली तीन, उसर्ली, गव्हाण, डेरवली, विचुंबे, पळस्पे येथे प्रत्येकी दोन, आदई, देवद, सुकापूर आणि पाले बुद्रुकमध्ये प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत 997 कोरोनाचे रुग्ण सापडले असून 22 जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत 207 जण पॉझिटिव्ह; 168 जण कोरोनामुक्त
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत बुधवारी (दि. 8) 207 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोना बधितांची एकूण संख्या आठ हजार 279 झाली आहे. तर 168 जण बरे होऊन घरी परतले तर बरे झालेल्यांची एकूण संख्या चार हजार 913 झाली असून 59 टक्के रिकव्हरी रेट झाला आहे. तसेच नऊ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 269 झाली आहे.
नवी मुंबईत आतापर्यंत 23 हजार 447 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 14 हजार 747 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. सद्य स्थितीत नवी मुंबईत तीन हजार 97 रुग्ण उपचार घेत आहेत. नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 31, नेरुळ 41, वाशी 24, तुर्भे 20, कोपरखैरणे 23, घणसोली 29, ऐरोली 34 व दिघा 05 असा समावेश आहे.
उरण तालुक्यात 22 कोरोनाग्रस्त; एका रुग्णाचा मृत्यू
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
उरण तालुक्यात बुधवारी (दि. 8) कोरोनाचे 22 रुग्ण आढळले आहेत. तर बोकडविरा येथील एका कोरोना रुग्णाचा मृत्यु झाला आहे.
यामध्ये बोकडवीरा पाच, उरण चार, चिर्ले व विंधणे प्रत्येकी दोन, दिघोडे, जासई, जसखार, जेएनपीटी, करंजा, म्हातवली, मुलेखंड, नागाव, केगाव, येथील प्रत्येकी एक रुग्ण आढळले.उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 390 झाली आहे. त्यातील 247 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे . फक्त 134 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत नऊ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी महिती उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
रोहा तालुक्यात नऊ जणांना लागण
रोहे : प्रतिनिधी
रोहा शहरास तालुक्यातील ग्रामीण भागात एकुण बुधवारी (दि. 8) नऊ कोरोना बाधित आढळले असल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात चार व ग्रामीण भागात पाच व्यक्ती आढळले आहेत. यात सहा पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. तसेच दिवसभरात 26 जण बरे झाले आहे. रोहा शहरासह तालुक्यात रुग्णांची एकुण संख्या 211 आहे. यामध्ये 116 जण बरे तर सक्रीय रुग्णांची संख्या 93व दोघांचा मृत्यू झाला आहे.
कर्जतमध्ये 25 नव्या रुग्णांची भर; एकाचा मृत्यू
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात बुधवारी (दि. 8) तालुक्यात 25 रुग्ण आढळले. हा आत्तापर्यंतचा उच्चांक आहे. या 25 रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील 18 रुग्ण आहेत. मध्यंतरी एका उत्तरकार्यात सहभागी झाल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या एकदम वाढली होती. ती साखळी गेल्या तीन चार दिवसांपासून तुटली आणि रुग्ण वाढण्याची संख्या कमी झाली होती. बुधवारी नेरळ नजीकच्या डीग्निटी लाइफस्टाइल या वृद्धाश्रमातील तब्बल 12 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असून आत्तापर्यंत तेथे 14रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तो कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालल्याचे दिसत आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या 196 वर पोहोचली आहे.
पेण तालुक्यात 38 नवे बाधित
पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यात बुधवारी (दि. 8) कोरोनाच्या 38 रुग्णांची वाढ झाली आहे. एकुण प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या 246 वर गेली असुन यापैकी 97 रुग्ण बरे झाले आहेत. परंतु आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 141 जणांवर उपचार सुरु आहेत.
आढळलेल्या रुग्णांमध्ये नवघर सहा, गोळीबार मैदान सहा, कोलेटी पाच, जिते येथे तीन व एकाचा मृत्यू, वडगाव, प्रभूआळी, ठाकूर पाडा येथे प्रत्येकी दोन, उंबर्डे फाटा, प्रीतम बिल्डिंग, समर्थनगर, दादर, खरोशी, तरणखोप, काश्मीरे, खारपाडा, रोहिदासनगर, खानमोहल्ला (एक मयत), वरसई, निगडे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये दुरशेत व नरदास चाळ येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
महाड तालुक्यात नऊ नवे रुग्ण
महाड : प्रतिनिधी
महाड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असुन, एकाच घरातील सहा स्त्रिया आणि एका पुरुषाला तर महाड शहरात आई आणि मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. महाडमध्ये एकुण नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. महाड तालुक्यातील औद्योगिक वसाहत क्षेत्रात कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असुन, महाड बाजारपेठ बंद प्रमाने महाड एमआयडीसी मधील कारखाने देखील बंद करावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तसेच एकुण 42 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर पैकी 39 रुग्ण बरे झाले असुन, आठ मयत झाले आहेत. अजुन पर्यंत एकुण 89 रुग्णांची नोंद झाली आहे.