खालापूर : प्रतिनिधी – खोपोली शहरात पुन्हा नागरिकांनीच 18 ते 20 एप्रिल असे तीन दिवस कडक जनता कर्फ्यू जाहीर करून त्याचे पालन करण्यास सुरुवात केली. कर्फ्यूमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत.
केंद्र शासन व राज्य शासनाने 21 दिवसांचा 14 एप्रिलपर्यंत लोकडाऊन केला असताना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्र शासनाने या आजाराची साखळी तोडण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. खालापूर तालुका व खोपोली शहराच्या बाजूलाच असणार्या पनवेल व उरण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच असल्याने खोपोलीत पुन्हा नागरिकांनीच 18 ते 20 तीन दिवस पूर्णता लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील दुकाने बंद असल्याचे दिसून आले.