Breaking News

रायगडात सहा नगरपंचायतींमध्ये 237 उमेदवार निवडणूक रिंगणात

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या निवडणुकीत 237 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 53 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले.

रायगड जिल्ह्यात पोलादपूर, म्हसळा, तळा, माणगाव, पाली व खालापूर या सहा नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या सहा नगरपंचायतीमध्ये एकूण 360 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यातील 70 अर्ज छाननीत बाद ठरले होते. उरलेल्या 290 पैकी 53 अर्ज मागे घेण्यात आले असून आता निवडणूक रिंगणात 237 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत.

खालापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीतून 73 पैकी 25 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. ओबीसीसाठी या नगरपंचायतीमध्ये एकाच जागा आरक्षित असून सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयानुसार या जागेसाठी होणार्‍या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. अन्य 16 जागांसाठी आता 48 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहे. पाली येथील चार उमेदवार अर्ज बाद ठरविण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत अपिलात गेले होते. या अर्जांवरील निर्णय लागल्यानंतर 46 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. पोलादपूरमध्ये चार जणांनी माघार घेतली, 36 उमेदवार रिंगणात आहेत. तळा येथे 39 जणांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातील तीन उमेदवारांनी माघार घेतली 36 उमेदवार रिंगणात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. म्हसळामध्ये एकाने माघार घेतली, तेथे 38 उमेदवार रिंगणात आहेत. माणगाव नगरपंचायत निवडणुकीत 48 अर्ज वैध ठरले होते. 18 जणांनी माघार घेतली, 30 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply