Breaking News

कर्जत रेल्वेस्थानक परिसरात वाहने उभी करणार्यांवर बडगा

पोलीस आणि आरपीएफकडून ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई

कर्जत : बातमीदार

येथील रेल्वेस्थानक परिसरातील नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करणार्‍या वाहनचालकांवर कर्जत पोलीस, आरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कर्जत रेल्वेस्थानकाच्या भिसेगाव दिशेकडील पादचारी पुलासमोरील तसेच फलाट क्रमांक एकच्या मुख्य तिकीट खिडकी समोरील नो पार्किंग झोनमध्ये अनेक वाहनधारक बेकायदेशीर पार्किंग करतात. त्याचा प्रवाशांना अडथळा होतो. वेळोवेळी सूचना देऊनही वाहनधारक नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करत असल्यामुळे त्यांच्यावर आता कर्जत पोलीस आणि आरपीएफ यांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहनधारकांसोबत वादविवाद न करता नो पार्किंग झोनमधील सर्व वाहनांवर ई-चलानद्वारे कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

कर्जत रेल्वेस्थानकाच्या भिसेगाव दिशेकडील पादचारी पुलासमोर तसेच फलाट क्रमांक एकच्या तिकीट खिडकीसमोरील नो पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या सुमारे 50 दुचाकी वाहनांवर कर्जत पोलीस आणि आरपीएफ यांनी ई-चलनाद्वारे कारवाई केली.

ई-चलनाची कारवाई टाळण्यासाठी वाहनधारकांनी  कर्जत रेल्वेस्थानक परिसरात गाडी उभी करीत असताना ती नो पार्किंग झोनमध्ये नाही ना याची खात्री करावी, असे आवाहन कर्जत पोलीस आणि आरपीएफ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply