खोपोली : प्रतिनिधी
रायगड जिल्हा अॅथलिटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया असोसिएशनच्या वतीने रायगड जिल्हा क्रॉसकंट्री स्पर्धेचे रसायनी येथील पिल्लेज कॉलेज येथे आयोजन करण्यात आले होते. यात पूर्वा विनोद जाधव हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यामुळे तिची 25 व 26 डिसेंबर रोजी सांगली येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
पूर्वा जाधव ही खोपोली येथील केएमसी कॉलेजची विद्यार्थिनी असून डॉ. माने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. पूर्वाने याआधी शिशू मंदिर येथे शिकत असताना अमित विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्षे सराव केला. तिने शालेय गटात विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन क्रमांक पटकावले आहेत, तसेच ती मुंबई विभागातूनसुद्धा तीन वर्षे खेळलेली आहे.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …