पनवेल ः प्रतिनिधी
कोट्यवधींचा घोटाळा झालेल्या कर्नाळा बँकेचे चेअरमन व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम आणखी वाढला आहे. सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी न्यायालयाने पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 जानेवारीपर्यंत वाढ केली आहे.
कर्नाळा बँक घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार असलेल्या विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी (दि. 20) सुनावणी होती. या वेळी ईडीतर्फे अॅड. गोन्साल्विस, तर विवेक पाटील यांच्यातर्फे अॅड. राहुल ठाकूर हजर होते. या प्रकरणी पुढील सुनावणी 7 जानेवारी रोजी घेण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे विवेक पाटील यांचा मुक्काम तोपर्यंत तळोजा जेलमध्येच असणार आहे.
Check Also
रोटरी क्लबच्या पैठणी महोत्सवाचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने …
RamPrahar – The Panvel Daily Paper